कुस्ती क्षेत्रात कर्तृत्ववान, पैलवान. सम्राटयांची निवड..!

0
37

महाराष्ट्र कुस्ती संघटनेत वर्धा जिल्हा प्रमुख पदी पैलवान, सम्राट कांबळेची निवड..!

वर्धा जिल्ह्यातल्या कुस्ती क्षेत्रातील युवा, कर्तृत्ववान व समर्पित व्यक्तिमत्त्व पैलवान, सम्राट कांबळे यांची महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या वर्धा जिल्हा प्रमुख पदी नुकतीच निवड झाल्याची माहिती मिळताच कुस्ती क्षेत्रात उत्साहाच वातावरण निर्माण झाले असल्याचे आयोजकांनी सांगितले, त्यामुळे राज्यभरातून पैलवान कांबळे यांना शुभेच्छाचा वर्षाव बघायला मिळत आहे.
पैलवान, सम्राट कांबळेंची उल्लेखनीय कामगिरी म्हणजे,वर्धा केसरी,विदर्भ चॅम्पियन (२ वेळा),महाराष्ट्र केसरी स्पर्धा (७५ किलो गट) रौप्यपदक विजेते, ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन, तसेच सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील कार्य आदी,स्वबळावर वर्धा केसरी कुस्ती स्पर्धेचे दोन वेळा यशस्वी आयोजन व कुस्तीपटूंसह इतर खेळाडूंनाही वेळोवेळी मदत व प्रोत्साहन या सोबत शालेय क्रीडा स्पर्धा, महाराष्ट्र केसरी ट्रायल्स व विविध निवड चाचण्यांच्या आयोजनात सक्रिय भूमिकेत सहभाग असल्याचे देखिल पैलवान, कांबळे यांनी यावेळी सांगितले. पुढे ते म्हणाले,
जिल्ह्यातील कुस्तीची परंपरा अधिक मजबूत करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबविण्याचा ध्यास तसेच कुस्तीला नवे बळ मिळावे व अधिकाधिक युवा पैलवान घडावेत आणि त्यांना सक्षम व्यासपीठ मिळावे यासाठी सातत्याने प्रयत्न राहील पुढे ते म्हणाले, महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या माध्यमातून आता नवीन टीम आणि सर्वांच्या सहकार्याने वर्धा जिल्ह्यात कुस्ती चळवळीला अधिक वेग मिळेल, अधिकाधिक गुणवंत पैलवान घडतील आणि जिल्ह्याचे नाव राज्यभर उज्ज्वल होईल, असा विश्वास यावेळी पैलवान सम्राट कांबळेंनी व्यक्त केला.