भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षानिमित्त भव्य जाहीर सभा; विविध पुरस्काराचे वितरण..!

0
213
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षानिमित्त भव्य जाहीर सभा; विविध पुरस्काराचे वितरण..!
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संघर्षमय, लढाऊ, सामाजिक, राजकीय आणि रचनात्मक कार्याच्या गौरवशाली इतिहासाचा शताब्दी वर्ष

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षानिमित्त भव्य जाहीर सभा तसेच या कार्यक्रमात जीवन गौरव, मरणोत्तर जीवन गौरव आणि विशेष सन्मान अशा प्रतिष्ठेच्या गौरवचिन्हांचे वितरण विशेष आकर्षण ठरणार

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षानिमित्त भव्य जाहीर सभा; विविध पुरस्काराचे वितरण..!भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संघर्षमय, लढाऊ, सामाजिक, राजकीय आणि रचनात्मक कार्याच्या गौरवशाली इतिहासाचा शताब्दी वर्ष 

मुंबई : २६ डिसेंबर १९२५ रोजी, स्थापन झालेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संघर्षमय, लढाऊ, सामाजिक, राजकीय आणि रचनात्मक कार्याच्या गौरवशाली इतिहासाला शंभर वर्षे पुर्ण होत आहे. या निमित्ताने भाकपातर्फे रविवार, १४ डिसेंबर २०२५ रोजी, भायखळा इथे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमात जीवन गौरव, मरणोत्तर जीवन गौरव आणि विशेष सन्मान अशा प्रतिष्ठेच्या गौरवचिन्हांचे वितरण विशेष आकर्षण ठरणार असून या विविध पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. भायखळा इथल्या पहिली क्रॉस लेन, ना. म. जोशी मार्ग, भायखळा रेल्वे स्टेशन (पश्चिम) परिसरात सायंकाळी ४.३० ते ७.३० या वेळेत होणाऱ्या या सभेच्या अध्यक्षस्थानी भाकपा मुंबईचे सचिव कॉ. मिलिंद रानडे असल्याचे तसेच सभेला प्रमुख वक्ते म्हणून माजी, राज्यसभा खासदार, भालचंद्र मुणगेकर, भाकपाचे जनरल सेक्रेटरी कॉ. सुभाष लांडे, लोकसभा खासदार, अरविंद सावंत आणि आमदार, मनोज जामसूतकर हे मार्गदर्शन करणार असल्याच कॉ. क्रांती जेजुरकर, कॉ. अरुण निंबाळकर आणि कॉ. प्रकाश रेड्डी या आयोजकांनी सांगीतले आहे.